अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतच तिच्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ऑफ व्हाईट रंगाचा ब्लाऊज आणि प्रिंटेड लेंहग्यात सईचं सौंदर्य अधिकच खुललं आहे. यावर तिने घेतलेल्या प्रिंटेड जॅकेटने साऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. सईच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. सई ही आतापर्यंत अनेक सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तसेच सईने बॉलीवूडमध्येही तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. सई ताम्हणकरने आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. सईने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. तसेच नुकतच तिच्या नव्या प्रोजेक्टनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.