कपिल शर्मा मोठ्या प्रमाणात आयकर भरतो. कपिल शर्माच्या कमाईतील एक मोठा हिस्सा कर म्हणून भरतो.



कॉमेडीयन कपिल शर्मा याचा भारतासह जगभरात मोठा चाहतावर्ग आहे.



कपिल शर्माचं नाव आता भारतातील सर्वाधिक करदात्यांच्या यादीत सामील झालं आहे.



अभिनेता आणि कॉमेडीयन कपिल शर्मा भारतातील करदात्यांच्या टॉप 20 मध्ये सहभागी आहे.



महत्वाचं म्हणजे कपिल शर्मा साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन, करिना कपूर आणि कतरिना कैफ यांच्यापेक्षाही जास्त टॅक्स भरतो.



भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या टॉप 20 करदात्यांच्या यादीत कपिल शर्मा 11 व्या क्रमांकावर आहे.



मीडिया रिपोर्टनुसार, 2024 च्या आर्थिक वर्षात कपिल शर्माने सुमारे 26 कोटी रुपये अँडवान्स टॅक्स भरला आहे.



कपिल शर्माने करिना कपूरला मागे टाकलं आहे, मात्र तो ऋतिक रोशनच्या मागे आहे.



मीडिया रिपोर्टनुसार, करिना कपूरने 20 कोटी तर ऋतिक रोशनने 28 कोटी रुपये अँडवान्स टॅक्स भरला आहे.



भारतातील टॉप 20 करदात्यांच्या यादीत कपिल शर्माचं नाव अल्लू अर्जून (14 कोटी), शाहिद कपूर (14 कोटी) आणि कतरिना कैफ (11 कोटी) या सेलिब्रिटींच्या पुढे आहे.



'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधून कपिल शर्माची तगडी कमाई होते. याशिवाय त्याच्याकडे 7-8 छोटे-मोठे प्रोजेक्ट असतात.



कपिल शर्माने 2007 मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज' शो जिंकला होता. त्यानंतर त्याने अनेक शो आणि चित्रपट केले.



सध्या कपिल शर्मा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' सीझन 2 मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



कपिल शर्मा कॉमेडीयन, अभिनेता आणि गायक होण्यासोबतच एक निर्माताही आहे.