अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मुंबईत वांद्र्यातील इमारतीवरुन उडी घेत, त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलंय सहाव्या मजल्यावरुन उडी घेत मलायकाच्या वडिलांनी स्वतःला संपवलं सकाळी 9 च्या आसपास ही धक्कादायक घटना घडली मलायका अरोरा कामानिमित्त पुण्यात असून ती मुंबईला येण्यासाठी निघालीय सकाळी अनिल अरोरा यांनी राहत्या घरातून उडी घेत स्वतःला संपवलं, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं दुर्दैवानं रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला सध्या वांद्र्यातील भाभा रुग्णालयात त्यांचं पार्थीव ठेवण्यात आलंय वांद्र्यातील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. मुंबई क्राईम ब्रांचचं पथक घटनास्थळी दाखल झालं, त्यानंतर त्यांनी चौकशी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरुन कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मलायकाचे वडिल बऱ्याच दिवसांपासून आजारी होते.