किंग खान म्हणजे शाहरुख खान जरी सुपरस्टार असला तरी त्याला स्वच्छता आवडते.
कुटुंबातील सदस्य त्याच्या अभिनयापेक्षा स्वच्छतेचे चाहते आहेत.
शाहरुखने फिल्म फेस्टिव्हलच्या पॉडकास्टमध्ये याचा खुलासा केला. टीचर्स होमवर्कमध्ये स्टार्स द्यायचे
शाहरुखने सांगितलं की, कोविडदरम्यान त्याला दुसरी गोष्ट जी त्याला खूपच आवडते ती गोष्ट सापडली, ती म्हणजे घर स्वच्छ ठेवणे.
मला व्हॅक्युम क्लीन करायला, कपाट साफ करणे, कोपऱ्या-कोपऱ्यात जाऊन स्वच्छ करणे, हे खूपच आवडतं.
त्याला हे मेडिटेशन सारखं वाटतं, असंही त्याने सांगितलं होतं.
'ॲक्टिंग करण्याऐवजी मी घराची साफसफाई करतोय, म्हणून घरातलेही खूपच खुश आहेत''
शाहरुख खान हसतच म्हणाला की,''थोड्या दिवसांनी माझ्या घरचे लोकं सेटच्या लोकांसारखे साफसफाई पूर्ण झाल्यावर थंब्स अप देतील की, छान आहे.''