फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचा अभिनय क्षेत्र हे पहिलं करियर ऑप्शन नव्हतं. त्यांची स्वप्न वेगळी होती. पण ते बॉलिवूडमध्ये आले.
Published by: स्नेहल पावनाक
November 28, 2024
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिलाबी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा नव्हती. IAS ऑफिसर बनून देशाची सेवा करण्याचं तिचं स्वप्न होतं.
Published by: स्नेहल पावनाक
November 28, 2024
चंदीगडमध्ये जन्मलेल्या यामीला बालपणापासूनच स्टेज फोबिया होता, यामुळेच ती शाळेच्या कोणत्याच कार्यक्रमात भाग घ्यायची नाही.
Published by: स्नेहल पावनाक
November 28, 2024
यामुळे तिला आणि तिच्या कुटुंबियांना स्वप्नातही वाटलं नव्हतं की यामी पुढे जाऊन बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होईल. तिची सुरुवातीपासूनच IAS बनण्याची इच्छा होती.
Published by: स्नेहल पावनाक
November 28, 2024
यामीच्या वडिलांच्या मित्राच्या पत्नीने यामीला अभिनेत्री बनण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी यामीला सांगितलं की, तिच्यामध्ये अभिनेत्री होण्यासाठीचे सर्व गुण आहेत.
Published by: स्नेहल पावनाक
November 28, 2024
याचं काकूंनी यामी गौतमचे फोटो मुंबईतील एका प्रोडक्शन हाऊसला पाठवले आणि यामीला इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळाली.