अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने सौंदर्य, अभिनय कौशल्य आणि इंटेलिजेंसच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव कमावलं आहे.

'और प्यार हो गया' चित्रपटातून ऐश्वर्या रायने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.


2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं आणि त्यानंतर 2011 मध्ये आराध्या बच्चनचा जन्म झाला.



गेल्या काही काळापासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यात दुरावा आल्याच्या अनेक बातम्या व्हायरल होत आहेत.

घटस्फोटाच्या चर्चा अफवा असल्याचं अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, पण आता पुन्हा या चर्चांना उधाण आलं आहे.

दुबईमधील एका कार्यक्रमात ऐश्वर्या राय पोहोचली होती, जिथे तिच्या वेट लॉसने लक्ष वेधलं.

ब्लू आणि सिल्व्हर गाऊनमध्ये ऐश्वर्या राय फार सुंदर दिसत होती, तिने वजन कमी केल्याचं स्पष्ट दिसून येत होतं.

दुबईच्या ग्लोबल वुमन फोरम 2024 कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ऐश्वर्याच्या नावातील 'बच्चन' आडनाव हटवल्याचं पाहून चाहत्यांना धक्का बसला, आता हा सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा बनला आहे.

यावरुनच आता पुन्हा एकदा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.