अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या वैवाहिक नात्यांबाबत विविध चर्चा सुरू आहेत.
Image Source: Instagram
या दोघांमधील नातं आता अतिशय नाजूक वळणावर असल्याची चर्चा आहे.
Image Source: Instagram
सिनेइंडस्ट्रीत या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. अशातच आता ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मागील अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या ही मुलगी आराध्यासोबत राहत असून तिने अभिषेकचे घर सोडलं आहे.
Image Source: Instagram
ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत दुबईला गेली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Image Source: Instagram
या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ऐश्वर्याने वेडिंग रिंग घातली नसल्याचे दिसत आहे.
Image Source: Instagram
व्हायरल होत असलेला व्हिडिओ दुबईचा आहे. जिथे ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत SIIMA अवॉर्ड्समध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती.
Image Source: Instagram
व्हिडिओमध्ये ऐश्वर्याचे आयोजक तिचे स्वागत करताना दिसत आहेत.
Image Source: Instagram
ऐश्वर्यापूर्वी, जेव्हा अभिषेकला अनेकदा स्पॉट केले गेले होते, तेव्हा त्यानेही वेडिंग रिंग घातली नसल्याचे समोर आले होते.
Image Source: Instagram
चाहत्यांनी याकडे लक्ष वेधले होते. अभिषेकचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे पण तिने वेडिंग रिंग घातली नसल्याचे दिसत आहे. ही बाब नेटकऱ्यांनी वेधून घेतली आहे.