अभिनेत्री श्रिया सरन तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. श्रिया तिच्या आकर्षक स्टाईलसाठीही ओळखली जाते. पारंपारिक लूकसोबतच वेस्टर्न लूकमध्येही ती मनमोहक दिसते. श्रिया तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. आताही तिने काही फोटो शेअर केलेत, ते व्हायरल होत आहेत. श्रियाने साऊथच्या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. बॉलिवूडवरही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली. श्रियाकडे सध्या अनेक चित्रपट आणि जाहिराती आहेत. 'दृष्यम 2' या चित्रपटात ती अजय देवगनसोबत दिसली आहे.