अभिनेत्री वाणी कपूर आलिशान लाईफ जगतेय. चित्रपट आणि जाहिरातीच्या माध्यमातून ती पैसे कमावते. ब्रँड एंडोर्समेंटसाठी वाणी 30 लाख रुपये आकारते. एका चित्रपटासाठी वाणी एक ते दोन कोटी रुपये घेते. वाणी कपूरची संपत्ती 18 कोटी रुपये आहे. शमशेरा चित्रपटासाठी वाणीने पाच कोटी रुपये घेतले होते. इन्स्टाग्राम पोस्टमधूनही वाणी कमाई करते. वाणीचे इन्स्टाग्रामवर 6.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटातून तिने अभिनयाला सुरुवात केली होती. दिल्ली आणि मुंबईमध्ये वाणीचे घर आहे.