बॉलिवूडचे सुपरस्टार दिलीप कुमार यांची आज 100 वी जयंती आहे. भारतीय सिनेसृष्टीत दिलीप कुमार 'ट्रॅजेडी किंग' म्हणून ओळखले जायचे. दिलीप कुमार यांना पद्मभूषण, पद्मविभूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1900 रोजी पाकिस्तानात झाला. दिलीप कुमार यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. दिलीप कुमार यांनी 1944 साली 'ज्वार भाटा' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 1947 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'जुगनू' या सिनेमात दिलीप कुमार मुख्य भूमिकेत होते. दीदार आणि देवदाससारख्या सिनेमातील गंभीर भूमिकांमुळे दिलीप कुमार ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाऊ लागले. दिलीप कुमार यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'शक्ति' सिनेमात काम केलं होतं. दिलीप कुमार यांनी पाच दशकात त्यांनी 57 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे.