साऊथ चित्रपटांमधील अॅक्शन सीन्स, डायलॉग्स आणि या चित्रपटांमधील गाणी प्रेक्षकांची मनं जिंकतात. साऊथ चित्रपटांचे अनेक हिंदी रिमेक्स करण्यात आले. जाणून घेऊयात अशा बॉलिवूड चित्रपटांबाबत जे साऊथ चित्रपटांचे रिमेक आहेत
साथिया हा चित्रपट अलैपायुथे या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता, ज्याचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले होते. विवेक ओबेरॉय, राणी मुखर्जी यांनी या चित्रपटात काम केलं आहे.
हेरा फेरी हा 1989 मध्ये रिलीज झालेल्या रामजी राव स्पीकिंग या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.
रामजी राव स्पीकिंग हा चित्रपट 1971 च्या सी द मॅन रन या चित्रपटावर आधारित होता.
प्रियदर्शनचा भूल भुलैया हा चित्रपट 1993 मध्ये रिलीज झालेल्या मणिचित्रथाझू या मल्याळम चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.
गजनी हा 2005 मध्ये रिलीज झालेल्या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे.
गजनी या चित्रपटामध्ये आमिर खाननं काम केलं आहे.
प्रभू देवा दिग्दर्शित 'वॉन्टेड' या चित्रपटात सलमान खाननं काम केलं आहे. 2006 मध्ये रिलीज झालेल्या पोकिरी या तेलुगू चित्रपटाचा हा अधिकृत हिंदी रिमेक होता.
बीवी नंबर 1 हा 1995 साली रिलीज झालेल्या साथी लीलावती या चित्रपटाचा रिमेक आहे.
सलमान खान, करिश्मा कपूर, सुष्मिता सेन, अनिल कपूर आणि तब्बू यांनी बिवी नंबर-1 या चित्रपटात काम केलं आहे.