शहारुख खानचे चाहते त्याच्या 'जवान' (Jawan) आगामी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुखच्या जवान या चित्रपटाचा प्रीव्यू आज (10 जुलै) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमधील शाहरुखच्या लूक्सनं अनेकांचे लक्ष वेधले. जवान चित्रपटाच्या प्रीव्यूच्या शेवटी शाहरुख हा 'बेकरार करके हमें यूँ न जाइये' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये शाहरुखच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर कापड बांधलेलं दिसत आहे. जवान या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता शाहरुखच्या जवान या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जवान हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे.