अभिनेता शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. जवान या चित्रपटाचा प्रीव्यू काल (10 जुलै) प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रीव्यूनमध्ये जवान चित्रपटाच्या स्टार कास्टची झलक दाखवण्यात आली आहे. जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमधील दीपिका पादुकोणच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये दीपिकाच्या एका फाइट सीनची झलक दिसते. आता अनेक नेटकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की, जवान या चित्रपटामध्ये दीपिका ही शाहरुखच्या आईची भूमिका साकाणार आहे का? एका युझरनं ट्वीट शेअर करुन असा प्रश्न उपस्थित केला आहे की, 'जवान चित्रपटात दीपिका ही शाहरुखला तुरुंगात जन्म देणार का?' दुसऱ्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'जवान चित्रपटात दीपिका शाहरुखची आई होऊन कॅमिओ करणार आहे का?' आता दीपिका ही जवान चित्रपटामध्ये कोणती भूमिका साकारणार आहे? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. दीपिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. दीपिकाचा चाहता वर्ग मोठा आहे.