अल्लू अर्जुन हा साऊथचा सुपरस्टार भलताच फेमस आहे. त्याचे कोट्यवधी फॅन फॉलोअर्स आहे. रिअल लाईफमध्येही स्वभावाचे कौतुक केलं जातं. त्याने नुकतंच कोट्यवधी रुपयांच्या जाहिरात नाकारली आहे. ही जाहिरात तंबाखूची होती, त्यामुळे त्याने नाकारली. आपल्या फॅनमुळे ही जाहिरात नाकारली असल्याचं अल्लू अर्जुनने सांगितलं. आपण स्वत: कधी व्यसनाचं समर्थन करत नसल्याचं त्याने सांगितलं. या निर्णयामुळे अल्लू अर्जुनचे सर्वत्र कौतुक होत आहे.