दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे नाव आज मनोरंजन विश्वात गाजत आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते. आता नुकतेच रश्मिकाने तिच्या इन्स्टा पेजवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पारंपारिक पोशाखात दिसत आहे. या फोटोंमध्ये रश्मिकाने लाल रंगाची साडी परिधान केली असून, त्यासोबत तिने स्लीव्हलेस डीप नेक ब्लाऊज घातला आहे. साडीचा हा लुक पूर्ण करण्यासाठी रश्मिकाने स्मोकी आय आणि न्यूड मेकअप केला आहे. केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. याशिवाय रश्मिकाने लूक साधा ठेवण्यासाठी फक्त कानातले घातले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंना चाहत्यांनी एवढी पसंती दिली आहे की, आतापर्यंत त्यांना 8 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. पहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो... पहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो...