तामिळ चित्रपटांची लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नयनतारा नुकतीच तिच्या हनिमून ट्रिपनंतर मुंबईत परतली आहे. नयनतारा तिच्या हनीमूनवरून परत येताच सुपरस्टार शाहरुख खान स्टारर दिग्दर्शक एटली कुमारच्या जवान चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. जवान चित्रपटाच्या सेटवर पोहोचताच नयनताराची छायाचित्रे पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. यावेळी कॉलिवूडची लेडी सुपरस्टार नयनताराची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. नयनताराचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. नयनतारा 'जवान' चित्रपटाचे शूटिंग मुंबईतून सुरू करणार आहे. चाहत्यांना नयानताराच्या या चित्रपटाविषयी उत्सूकता आहे. नयनताराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नयनतारा नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. हनीमुनवरून परतताच नयनताराने शूटिंगला सुरूवात केली आहे.