बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' अशी ओळख असणाऱ्या प्रीती झिंटाचा आज 48 वा वाढदिवस. प्रीतीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं तसेच ती किंग्ज इलेव्हन पंजाब या क्रिकेट टीमची मालकीण देखील आहे. प्रीतीचा जन्म 31 जानेवारी 1975 मध्ये हिमाचल प्रदेश येथे झाला. प्रीती ही 13 वर्षाची असताना तिच्या आई-वडिलांचा अपघात झाला. या अपघातात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. प्रीतीनं शिमला येथे शिक्षण घेतलं. प्रीतीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1998 मध्ये रिलीज झालेल्या दिल से या चित्रपटामधून प्रीतीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. प्रीतीचं नाव अनेकवेळा बिझनेसमॅन तसेच क्रिकेटर्ससोबत जोडलं गेलं. प्रीतीनं 2016 मध्ये प्रितीने जीन गुडइनफसोबत लग्नगाठ बांधली. प्रीती ही सरोगसीच्या माध्यमातून वयाच्या 46 व्या वर्षी आई झाली. 2021 मध्ये तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला. कल हो ना हो, कभी अलविदा ना कहना, कोई मिल गया, सलाम नमस्ते, वीर जारा या चित्रपटांमधील प्रीतीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली प्रीतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. प्रीती ही सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.