बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा आपल्या आउटफिट्ससोबत एक्सपरिमेंट करताना दिसतात. बॉलिवूड अभिनेत्रींबाबत बोलायचं झालं तर अभिनेत्री नुसरत भरूचाला विसरुन चालणार नाही. सध्या तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत. फ्लोरल स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये तिचा लूक क्लासी दिसतोय. स्टायलिश हेअर लूकसह नुसरतनं क्लासी पोझ दिल्यात. चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडलाय. नुसरतच्या किलर लूकवर चाहते घायाळ झालेत. नुकताच नुसरतचा 'जनहित में जारी' चित्रपट रिलीज झालाय. नुसरतच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर, ती अभिनेता अक्षय कुमारसोबत 'सेल्फी'मध्ये स्क्रिन शेअर करणार आहे. (सर्व फोटो : इंस्टाग्राम @nushratbharucha)