मलायका अरोरा तिच्या हॉटनेसबद्दल चर्चेत असते. बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी ती एक आहे. मलायका तिचे बोल्ड फोटो नेहमी शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोंना लाखो लाईक्स मिळतात. हॉट दिसणारी मलायकाने काही कूल फोटोही शेअर केलेत. मलायकाच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळतेय. मलायका सध्या 'मुव्हिंग इन विथ मलायका' या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. 1998 साली मलायकाचा अरबाज खान सोबत विवाह झाला होता. अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली. मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाच्या अफवा नेहमी उठतात.