अभिनेत्री कृती खरबंदाने साडीतील लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अत्यंत आकर्षक आणि मनमोहक दिसत आहे. कृती साडीमध्ये नेहमीच सुंदर दिसते. तिचा गुलाबी साडी आणि मोकळे केस हा सिंपल लूक अनेकांना भावला. कृतीच्या या सिंपल पण स्टायलिश लूकवर चाहते फिदा झाले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. कृती खरबंदाने अनेक हिंदी चित्रपटात काम केलं आहे. तिने साऊथच्या चित्रपटातही काम केलं आहे. 'शादी मे जरुन आना' या चित्रपटातल्या तिच्या अभिनयाचे कौतुक झालं आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार रावने अभिनय केला आहे.