अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच चर्चेत असते. मौनी आपल्या स्टाईलने सगळ्यांना वेड लावते. मौनीची प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडते. मौनी रॉय स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज जिमला जाते. फिट राहण्यासाठी ती व्यायामासोबतच डान्स क्लासला देखील जाते. मौनी आज डान्स क्लासबाहेर दिसली. तिचे फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी मौनी ब्लू क्रॉप टॉप आणि ब्लॅक जॅगिंगमध्ये दिसली. काळ्या सनग्लासेसने तिने हा लूक पूर्ण केला. मौनीने या आउटफिटसोबत पोनीटेल बनवले आहे. मौनीचा हा साधा लूक चाहत्यांची मनं जिंकत आहे.