आयपीएल 2022 च्या हंगामापूर्वी महालिलाव पार पडला. ज्यात अनेक बदल झाल्याने अनेक स्टार खेळाडूंना त्यांचा संघ सोडावा लागला.



याती एक नाव म्हणजे आरसीबीचा स्टार खेळाडू युजवेंद्र चहल



चहलला गमावल्यानंतर बंगळुरुला आता मात्र याचा पश्चाताप होत आहे. कारण चहलने यंदा राजस्थानकडून 11 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या आहेत.



हैदराबादला 2016 साली आयपीएलचा चषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या डेव्हिडचा 2021 साली खराब फॉर्म असल्यामुळे त्याला संघातून बाहेर ठेवलं.



2022 ला हैदराबादने वॉर्नरला परत घेतलं नाही. त्यानंतर दिल्लीकडून वॉर्नरने तुफान कामगिरी करत 52.17 च्या शानदार सरासरीने 313 रन केले आहेत.



2021 मध्ये चेन्नई संघाचा महत्त्वाचा गोलंदाज जोश हेजलवुड यंदा बंगळुरुत असून 7 सामन्यात त्याने 11 विकेट्स घेतले आहेत.



कोलकाता संघाने दोन वर्षे कुलदीप यादवला बेंचवर बसवून ठेवलं. यंदा मात्र तो दिल्लीत सामिल झाला आहे.



कुलदीपने आतापर्यंत 10 सामन्यात 18  विकेट्स घेतल्या आहेत. तो पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 



स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या. मुंबईचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असणाऱ्या हार्दिक यंदा लिलावापूर्वीच गुजरात संघाचा कर्णधार झाला.



हार्दिकने आतापर्यंत 10 सामन्यात 333 धावा ठोकल्या असून कर्णधार म्हणूनही त्याने उत्तम कामगिरी केली आहे.