बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा पडद्यावर साकारल्या आहेत कोणत्याही भूमिकेत ती स्वत:ला चांगल्या प्रकारे सामावून घेऊ शकते हे तिने फार कमी वेळात इंडस्ट्रीला दाखवून दिले आहे. मात्र, आजकाल तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या लूकमुळे देखील चर्चेत येऊ लागली आहे जवळजवळ दररोज चाहत्यांना तिचा नवीन आणि सिझलिंग लूक पहायला मिळतो. आता तिने पुन्हा एकदा तिचा नवा अवतार चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या लूकमध्ये हुमा खूपच बोल्ड दिसत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये हुमा कुरेशीने पिंक रंगाची पॅन्ट आणि ब्रालेट घातलेला दिसत आहे. त्यासोबत तिने पिंक जॅकेट पेअर केलं आहे. लूक पूर्ण करण्यासाठी हुमाने हलका मेकअप केला आहे आणि केस बांधले आहेत. मॅचिंग लिपस्टिक तिच्या लुकमध्ये भर घालत आहेत.