बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्री दररोज वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसते. इंडस्ट्रीतील स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक मलायका अरोरा वयाच्या 48च्या वर्षीही अनेक तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते. अभिनेत्रीकडे पाहून तिच्या वयाच्या अंदाज लावणे जवळजवळ अशक्य आहे. आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेली मलायका पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मलायकाने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मलायका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिची ही शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. पिवळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये मलायकाने तिच्या किलर लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे या फोटोंमध्ये मलायकाही वेगवेगळ्या फोटो पोज देताना दिसत आहे. मलायकाचे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.