मराठी बिग बॉस या शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. अनेकदा ती आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर फोटो शेअर करत असते. बिग बॉस मराठीमुळे नावारूपाला आलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सई पती तीर्थदीपसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद लुटत आहे. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सईने पतीसोबत खास रोमँटिक फोटोशूट केले आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सई सध्या फिरस्ती झाली आहे. ती सतत नवनव्या ठिकाणांना भेट देत असते आणि या ट्रिप्सचे फोटो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असते. नेहमी साध्या आणि सोज्वळ लूकमध्ये दिसणारी सई आता चक्क बोल्ड लूकमध्ये दिसली आहे. सईचं हे बोल्ड फोटोशूट प्रचंड चर्चेत आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’सोबतच, 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती.