मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिचं नाव आवर्जून घेतलं जातं.
टेलिव्हिजनपासून सुरू झालेला प्राजक्ताचा प्रवास आता चित्रपट आणि ओटीटी पर्यंत येऊन पोहोचला आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांशी कनेक्टेड राहते.
अभिनयाव्यतिरिक्त प्राजक्ताला भटकंती देखील आवडते. शूटिंगमधून वेळ मिळाला की, ती आवर्जून फिरायला जाते.
नुकतीच प्राजक्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या टीमसोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते.
गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर आता प्राजक्ता माळीने सहकुटुंब ‘परळी वैजनाथा’चं दर्शन घेतलं आहे.
अभिनेत्रीने मंदिरात पूजा करतानाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘माझ्या पायाला बांधलाय भवरा…होय, सध्या खूपच प्रवास करतेय.. करोनानंतर सुरू झालेल्या उत्सवांचा आनंद लुटतेय’, असं म्हणत तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने मंदिरात पूजा करतानाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.