गणपती बाप्पाचं आगमन सगळ्यांकडेच झालं आहे. यानंतर अनेकांच्या घरी गौराई देखील आल्या आहेत. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री राधा सागर हिच्याकडे देखील गणपती बाप्पासोबत गौराईचे आगमन झाले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे. अभिनेत्री राधा सागर हिने आपल्या घरातील गणपती बाप्पा आणि गौराईसोबत हे छान फोटो काढले आहेत. गणपती बाप्पाच्या आणि गौराईच्या सेवेत लीन झालेल्या अभिनेत्रीने सुंदर हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. गणपती बाप्पा आणि गौरींना वंदन करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासाठी सुंदर स्माईल दिली आहे. यंदा गणेशोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळत आहे. कोरोनानंतर तब्बल 2 वर्षांनी पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळत आहे. साध्या लूकमध्येही अभिनेत्री राधा सागर खूप सुंदर दिसत आहे. (Photo : @radhasagarofficial/IG)