'बस्ती का हस्ती' अशी ओळख असलेला एमसी स्टॅन सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. 'बिग बॉस 16'च्या माध्यमातून एमसी स्टॅन घराघरांत पोहोचला आहे. रॅपर एमसी स्टॅन त्याच्या रॅपपेक्षा हटके स्टाइल आणि बोलण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे जास्त चर्चेत आहे. 'बिग बॉस 16'मध्ये एमसी स्टॅनची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. एका कार्यक्रमाचं एमसी स्टॅन 20 ते 25 लाख मानधन घेतो. 23 वर्षीय रॅपरची एकूण संपत्ती 16 कोटींच्या घरात आहे. 'बिग बॉस 16'च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅनला 31 लाख 80 हजार रुपये रक्कम देण्यात आली. 'बिग बॉस 16' जिंकल्यानंतर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. अरजित सिंह, एआर रहमानला एमसी स्टॅनने मागे टाकलं आहे. एमसी स्टॅनचा '80 हजार के जूते' हा डायलॉग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.