गौहर खान लग्नानंतर चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.

प्रत्येक कार्यक्रमात ती एकाहून एक सुंदर स्टाईलमध्ये दिसते.

बिग बॉस 7 ची विजेता गौहर खाननं 2003 मध्ये आलेल्या 'मिस इंडिया' सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली.

आज ती बॉलिवूडमधील एक चर्चित चेहरा आहे.

सोबतच ती एक यशस्वी मॉडेलही आहे.

नुकतंच गौहरने तिचं एक नवं फोटोशूट सोशल मीडियाद्वारे शेअर केलं.

या फोटोमध्ये गौहरचा कॅज्युअल लूक दिसून येत आहे.

मोकळे केस आणि मेकअपसह तिने हा लूक पूर्ण केला आहे.

अभिनेत्री गौहर खानने काही दिवसांपूर्वी जैद दरबारसोबत लग्नगाठ बांधली.

परंतु, याआधी गौहरचं अफेअर कुशाल टंडनसोबत होतं. दोघेही बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये दिसून आले होते. तिथेच त्यांच्यात प्रेम जुळलं. दरम्यान, काही दिवस एकत्र राहिल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं.