68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची चर्चा सध्या मनोरंजनसृष्टीत होत आहे.

या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

तर अजयच्या 'तान्हाजी' या सिनेमाला लोकप्रिय हिंदी सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

'तान्हाजी'ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होणं अभिमानास्पद,

असे म्हणत राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अजय देवगणने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अजय देवगण म्हणाला,

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाल्याचा खूप आनंद होत आहे.

या पुरस्काराने मला आतापर्यंत तिसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले आहे.

यंदाचा हा पुरस्कार 'तान्हाजी' सिनेमासाठी मिळाला आहे.