प्रियांका चोप्राने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रियांकाच्या बर्थडे पार्टीला फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. नुकतेच प्रियांकाने तिच्या वाढदिवसाचे काही न पाहिलेले फोटो शेअर करून सर्वांचे आभार मानले आहेत. या फोटोंमध्ये ती सगळ्यांसोबत खूप आनंदी दिसत आहे. पण, या फोटोंमध्ये सगळ्यांच्या नजरा तिच्या मुलीवर खिळल्या आहेत. प्रियांकाने पुन्हा एकदा लेकीचा फोटो शेअर केला आहे. मात्र, यातही तिने मालतीचा चेहरा दाखवलेला नाही. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या वाढदिवसाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यात काही ग्रुप फोटो आहेत, ज्यामध्ये सर्वजण एकत्र उपस्थित आहेत. एका फोटोमध्ये प्रियांका मुलगी मालतीसोबत दिसली आहे. प्रियांका निक आणि मालतीसोबत फोटो पोज देत आहे. प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने नुकतेच ‘सिटाडेल’चे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय ती 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटातही दिसणार आहे.