बिग बॉस 13 फेम अभिनेत्री शेहनाज अनेकदा तिच्या चाहत्यांना इंस्टाग्रामवर स्वतःचे जबरदस्त फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.

यावेळी, तिने डब्बू रतनानीच्या फोटोशूटमधील फोटोंचा पहिला सेट शेअर करून तिने तिच्या चाहत्यांना होळीनंतरची भेट देऊन आनंदित केले.

शहनाज गिलने अलीकडेच डब्बू रत्नानीसोबत दुसऱ्यांदा काम करण्याची घोषणा केली होती.

या फोटोशूटच्या वेळी जांभळ्या रंगाची रफल्ड बेल बॉटम पॅन्ट शहनाजने घातलेली त्यावर मॅचिंग जॅकेट घातले होते.

तिने तिचे केस पोनीटेलमध्ये बांधले आणि कमीतकमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला.

शहनाज गिल शेवटची पंजाबी फिल्म होंसला रखमध्ये दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा सोबत दिसली होती. तिने बिग बॉस 15 ग्रँड फिनाले भागामध्ये देखील हजेरी लावली.

सिद्धार्थसोबतचा तिचा बॉण्ड हा शोच्या मुख्य आकर्षणांपैकी एक होता. ती शो जिंकू शकली नसली तरी शहनाजने सर्वांची मने जिंकली.