चिपळूण नजीकच्या परशुराम घाटातील हा परशुराम पॉईंट इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनाला भुरळ घालत आहे पहिल्याच पावसामुळे इथले खुललेले निसर्गाचे सौदर्य प्रवाशांना खुणावत आहे रिमझिम पावसात सह्याद्रीच्या कडेकपारीतून वाहणारी वाशिष्टी आणि मध्येच धावणारी रेल्वे नदीच्या बाजूलाच नारळी आणि पोफळीच्या बागा आणि त्यात टुमदार कौलारु घरे मन मोहून टाकणारी ही निसर्गाची दृश्ये रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नदी म्हणजे वाशिष्ठी तिवरे इथे अडीच हजार फूट उंच पर्वतराजीतून या नदीचा उगम होतो. चिपळूण, खेड, दापोली आणि गुहागर या तालुक्यांमध्ये वाशिष्ठीचे पाणलोट क्षेत्र आहे.