टी-सीरीज कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक भूषण कुमार यांच्याविरोधातील बलात्कार प्रकरणातील पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावला.
तपासादरम्यान विविध कायदेशीर बाबींमध्ये तडजोड झाल्याचे न्यायालयाने नमुद केले आहे.
तक्रारदार महिलेने कायद्याचा गैरवापर केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
त्यामुळे पोलिसांनी कायद्यानुसार या प्रकरणाचा तपास करावा अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.
महिलेच्या तक्रारीवरून डीएन नगर पोलिसांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये भूषणकुमारविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणातील तक्रारदार महिलेने अंतिम अहवालाला (बी- समरी) समर्थन देत कायद्यातील तरतुदींचा गैरवापर केला हे लक्षात घेत न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाची कायद्यानुसार चौकशी करण्याचे निर्देश दिले