भोजपुरी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने वेगळी जागा निर्माण करणारी नेहा मलिक सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचा नेहमीच स्टायलिश आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. नेहा मलिकने स्टनिंग अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहा मलिक ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये सिझलिंग अंदाजात दिसत आहे. नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे. नेहा मलिक मनिंदर बत्तरच्या गाजलेल्या 'सखियाँ' या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली आहे. नेहा मलिक सध्या 30 वर्षांची आहे. तिचा जन्म 31 मे रोजी मुंबई येथे झाला. नेहा मलिकचं शिक्षणही मुंबईतच झालं आहे. तिने 2012 साली मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. नेहा मलिकने 'भनवारी की चाल' या भोजपुरी चित्रपटातून करियरला सुरुवात केली. नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते. ही भोजपुरी अभिनेत्री तिच्या बोल्ड स्टाईलसाठीही ओळखली जाते.