'अंगूरी भाभी'ची व्यक्तिरेखा साकारणारी टीव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या आपल्या लूकमुळे चर्चेत आहे. ती 'भाबी जी घर में हैं' या कॉमेडी शोमध्ये अंगूरी भाभीच्या भूमिकेत बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या जोरावर तिने घरोघरी एक वेगळी आणि खास ओळख मिळवली आहे. जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा ती तिच्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे मग्न होते. शुभांगी पडद्यावर नेहमीच एका साध्या स्त्रीच्या भूमिकेत दिसली आहे. मात्र, ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. याची झलक तिच्या इन्स्टाग्राम पेजवरही अनेकदा पाहायला मिळते.