विनोदवीर भारती सिंह नेहमीच तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकत असते. भारती आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. त्यांना 3 एप्रिल रोजी पुत्रप्राप्ती झाली. भारती सिंहने आता तिच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे. छोट्या पडद्यावरील विनोदवीर भारती सिंह तिच्या मुलाला प्रेमाने 'गोला' अशी हाक मारते. पण ‘ई-टाइम्स’च्या वृत्तानुसार भारतीने तिच्या मुलाचे नाव लक्ष्य असे ठेवले आहे. भारती सिंह 2017 साली हर्ष लिंबाचियासोबत लग्नबंधनात अडकली आहे. भारती सिंहने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. भारती सिंह गेले अनेक दिवस तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. भारतीने यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर करत गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.