मुंबईजवळच्या डोंबिवलीत दुर्मिळ 'इंडियन स्टार टॉरटॉईज' आढळले.



इंडियन स्टार टॉरटॉईज या प्रजातीच्या कासवाची किंमत काळ्या बाजारात लाखों रुपये आहे.



या प्रजातीचे कासव संरक्षित प्रजातीत मोडत असल्याने हे कासव पाळणे गुन्हा आहे.



या कासवाचा वापर धनलाभ या अंधश्रद्धेपोटी देखील केला जातो.



दुर्मिळ प्रजातीचा इंडियन स्टार टॉरटॉईज डोंबिवलीतील एकतानगर परिसरात असल्याची माहिती वॉर प्राणी संघटनेच्या भूषण पवार यांना मिळाली



भूषण पवार यांनी ही माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.



त्यानंतर वन अधिकारी रघुनाथ चन्ने आणि राजू शिंदे यांनी वॉर प्राणी संघटनेच्या मदतीने डोंबिवलीतून या कासवाला रेस्क्यू केले.



वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे कासव इंडियन स्टार जातीचे असून ते ताडोबा, गुजरात परिसरात आढळते.



सध्या या कासवाची वैद्यकीय तपासणी करत याला त्याच्या मूळ ठिकाणी सोडण्यात येणार आहे.