संत्र रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते तसेच रोगांपासून संरक्षण करण्याचे काम करते. हिवाळ्यात रोज संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. संत्र्यांमध्ये भरपूर फायबर असते. जे पचनशक्ती मजबूत करते. संत्र्याचे सेवन रोज केल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते. लिंबूवर्गीय फळे विशेषत: संत्री स्ट्रोकचाा धोका कमी करतात. संत्री केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आपली त्वचाही नितळ ठेवण्याचं काम करतात. संत्री हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. डोळ्यांसंदर्भात काही तक्रारी असतील तर रोज संत्री खाण्याची किंवा संत्र्याचा रस पिण्याची सवय लावा.