कडुलिंबाचा उपयोग अनेक छोट्या-मोठ्या आजारांवर उपाय म्हणून केला जातो. इतकंच नाही तर, याचा उपयोग सौंदर्य वाढवण्यासाठीही केला जातो. कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असण्यासोबतच अँटी ऑक्सिडेंट्सही मोठ्या प्रमाणात आढळतात. कडुलिंबाची ताजी पाने बारीक करून त्यात मध टाकून रोज खाल्ल्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. कडुलिंबाची पानं पाण्यात टाकून आंघोळ करणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. कडुलिंबाची पानं रक्त शुद्ध करण्यासाठी उपयोगी मानली जातात. कडुलिंबाची ताजी पाने वाटून ती तुम्ही केसांवर लावू शकता. यामुळे कोंडा कमी होईल आणि केसही निरोगी राहतील. कडुलिंबाच्या काडीने दात स्वच्छ करणे चांगलं मानलं जातं. यामुळे बॅक्टेरियापासून सुटका होते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.