मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो. दूध लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. दूधाबरोबर कॉर्नफ्लेक्स, ड्रायफ्रूट्स असे वेगवेगळे पदार्थ घालून दूध प्यायल्यास छान लागते. निरोगी आहारासाठी दूध हे सर्वात महत्वाचे पोषक घटक आहे. दूध कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी प्रदान करते. दुधामुळे हाडे फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांपासून बचाव होतो. दूध प्यायल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कमी होण्यास मदत होते. दूध पिल्याने तुमचा मूड आणि संज्ञानात्मक कार्य सुधारण्यास मदत होते. दूध हे मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे.