सध्या ती तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मौनीने तिच्या मेहनतीमुळे इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. मौनीने नेहमीच तिच्या स्टायलिश आणि बोल्ड लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता पुन्हा एकदा मौनीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मौनीने ब्राउन आणि ब्लॅक कलरची साडी नेसलेली दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग फुल स्लीव्हज ब्लाउज पेअर केले आहे. मौनीने कमरेला मरून बेल्ट घालून तिच्या लूकमध्ये सौंदर्य वाढवले आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी मौनीने राजस्थानी टच दिला आहे. मौनीने नेक चोकर, ब्रेसलेट, मांगटिका आणि अंगठीसह तिचा लुक ऍक्सेसरीझ केला आहे. मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या डान्स रियालिटी शो 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स'मध्ये दिसत आहे.