पुदिना हा शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतो. पुदिन्यामुळे शरीराला थंडावा मिळण्यास मदत होते. पुदिन्याच्या पानांमध्ये सॅलिसिलिक ऍसिड आढळते. पुदिन्याच्या पानांचा उपयोग चेहरा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. पुदिना आणि लिंबाचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळण्यास मदत होऊ शकते. पुदिन्याची पानं आणि मध देखील चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरु शकते. पुदिना आणि गवती चहा चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. चेहऱ्यासाठी पुदिन्याची ताजी पानं उपयुक्त ठरतात.