हिंदू धर्मात गाईला देवी-देवते प्रमाणे पुजले जाते.

त्यामुळे गाईची सेवा आणि पूजेला विशेष महत्व आहे.

असे, म्हटले जाते की, गाईत 33 कोटी देवी-देवतांचा वास असतो.

तसेच गाईला जेवण दिल्याने पुण्य मिळते व संकटे दूर होण्यास मदत होते.

गाईला गूळ खाऊ घालणे शुभ मानले जाते.

असेही म्हटले जाते की, गाईला रोज गूळ खायला दिल्याने कुंडलिती मंगळ दोष दूर होतो.

शनी दोष असल्यास गाईला गूळ खाऊ घालावा.

गाईला गूळ खाऊ घातल्याने राहू-केतू दोषापासूनही सुटका मिळते.

गाईला गूळ खाऊ घातल्यास विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.