पृथ्वी सूर्याच्या चारी बाजूने फिरते, यासाठी तिला एक वर्ष लागते.

यामुळे पृथ्वीच्या वातावरणात बदल होतात.

पृथ्वी तिच्या अक्षावर फिरते ज्यामुळे दिवस आणि रात्र ही क्रिया घडते.

पृथ्वीला तिच्या अक्षावर फिरण्यासाठी जवळपास 24 तास लागतात.

पृथ्वी तिच्या अक्षावर दर तासाला जवळपास 1000 मैलच्या वेगाने फिरत असते.

पण, पृथ्वीने अचानक फिरणे बंद केल्यास पृथ्वीच्या अधिकांश भागात प्रलय येऊ शकतो.

जर पृथ्वीने तिचे फिरणे बंद केले तर तिच्या अर्ध्या भागाला सूर्याच्या तापमानाचा सामना करावा लागेल.

तसेच पृथ्वीच्या इतर भागांवर अंधार आणि तेथील वातावरण थंड होऊन जाईल.

असेही म्हटले जाते की, पृथ्वीने फिरणे थांबवले तर पृथ्वीवरील जीवांचा मृत्यू होऊ शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.