अंड्यात जीवनसत्त्व आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जरी दररोज एक अंडे खाल्ले तरी त्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात.



अंड्यांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते. हे दोन्ही घटक हाडे मजबूत करतात, अंडी हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.



वय वाढतं तसं शरीर कमकुवत होत जातं. अशा वेळी सांधेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. पण रोज एक अंडे खाल्ल्यास सांधेदुखीपासून मुक्ती मिळते.



अंड्यातील जीवनसत्त्वे हाडे आणि सांधेदुखीपासून आराम देतात. तसेच शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता दूर करते.



अंडी हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. प्रथिने स्नायू तयार करतात. वाढत्या वयात स्नायू कमकुवत होतात, अशा वेळी रोज एक अंड खाणं फायदेशीर ठरते.