सुंदर दिसणारं ड्र्रॅगर फ्रुट आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. ड्र्रॅगर फ्रुटमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी असते. त्यामळे हृदयाच्या आरोग्यासाठी हे फळ खूप फायदेशीर ठरु शकते. यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होऊ शकते. यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे बराच वेळ पोट भरलेलं असतं. तज्ज्ञांनुसार, मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी ड्रॅगन फ्रुट अत्यंत फायदेशीर ठरु शकते. ड्र्रॅगर फ्रुटमध्ये व्हिटॅमिनचे प्रमाण देखील जास्त असते. त्यामुळे चेहरा देखील चमकदार होतो. पण ड्र्रॅगर फ्रुट हे कापल्यानंतर तात्काळ खावे. याशिवाय तुम्ही ड्र्रॅगर फ्रुटचा ज्युस देखील पिऊ शकता. ड्र्रॅगर फ्रुटचा ज्युस देखील फायदेशीर ठरु शकतो.