मधूमेह असणाऱ्या रुग्णांना साखर खाता येत नाही. त्यामुळे अशा लोकांसाठी नारळाची साखर फायदेशीर ठरु शकते. ही सारख नेहमीच्या साखरेपेक्षा फार वेगळी असते. या साखरेचा समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये देखील करु शकता. यामध्ये लोह, झिंक आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. तसेच यामध्ये इंन्सुलिन आणि सॉल्युबल फायबर देखील आढळते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी नारळाची साखर फायदेशीर ठरु शकते. यामुळे चक्कर येणे आणि भरपूर प्रमाणात घाम येणे यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यासाठी देखील ही साखर फायदेशीर ठरु शकते. यामध्ये अँटी ऑक्सिडंट आढळतात ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.