गोड पदार्थांमध्ये घालण्यासाठी आणि पदार्थांची चव वाढवण्यासाठी गुळाचे सेवन केले जाते. हिवाळ्याच्या दिवसात साखरे ऐवजी गुळ खाणं पसंत करतात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारेच गुळ मिळतात. गुळाची चव त्याच्या बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. जर तुम्ही अस्सल गुळ म्हणजेच भेसळ नसलेला गूळ विकत घेण्याच्या विचारात असाल तर गावच्या ठिकाणाहूनही मागवू शकता. गुळ खाल्याने इम्यूनिटी वाढते पोटाचे त्रास कमी होतात रक्त वाढण्यास मदत होते गुळ -चपाती खाण्याचे बरेच फायदे मिळतात