कलिंगडाचा ज्यूस पिल्याने अनेक पोषण तत्वे शरिराला मिळतात. यामुळे अनेक फायदे देखील होतात. कलिंगडाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. तसेच यामध्ये व्हिटॅमिन बी 6 देखील मोठ्या प्रमाणावर असते. यामध्ये अँटी ऑक्सीडंट देखील मोठ्या प्रमाणावर असतात. कलिंगडाच्या ज्यूसमध्ये कॅलेरीचे प्रमाण देखील कमी असते. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगडचा ज्यूस पिणे फायदेशीर ठरु शकते. यामुळे हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील कलिंगडाचा ज्यूस फायदेशीर ठरु शकतो.